भाई - व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध:
लिहिण्यापूर्वी: या चित्रपटाच्या पूर्वार्धाबद्दल अनेक उलट सुलट प्रतिक्रिया वाचल्या. त्यात मला पडायचे नाही. पटकथा लेखक आणि दिग्दर्शक यांना भाई जसे भावले तसे त्यांनी व्यक्त केले. त्यात त्यांनी थोडीशी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली इतकेच. त्यात त्यांचा 'गल्लाभरू' हेतू नव्हता हे नक्की. एक स्वतंत्र कलाकृती म्हणून मी त्याकडे बघतो. उत्तरार्धाबद्दलही माझा दृष्टिकोन तोच आहे.
उत्तरार्धात सुरुवातीलाच सखाराम गटणे येतो. तो आपल्या 'प्राज्ञ परीक्षेची' पातळी दाखवून जातो (आजन्म उपकृत, जीवनविषयक सूत्र वगैरे). नंतर विजया मेहता डोकावून जातात. त्यांचा, 'सुंदर मी होणार' या भाईंच्या नाटकातला, दीदी राजे आणि बेबी राजे यांचा प्रवेश छान जमला आहे. जाता जाता विजया बाई, 'बाईट' मागायला आलेल्या 'वाहिनी' वाल्याना 'ऐकवून' जातात.
भाई हे दूरदर्शनचे निर्माते. दूरदर्शनवरचा पहिला कार्यक्रम सादर करायचा मान भाईंकडे जातो. 'दूरदर्शन' ऐवजी 'प्रकाशवाणी' असा शब्द भाईंनी सुचवला होता (तो वापरला गेला नाही... असो). पुढे भाई, ही नोकरी सोडून 'बटाट्याची चाळ' सादर करतात. याठिकाणी आचार्य अत्रे, त्यांच्या त्या 'दहा हजार वर्षे' या शब्दप्रयोगासहित भेटून जातात.
पुढे, रक्तपेढीमध्ये Preservation ची सोय नाही हे बघून, भाई आपल्या नाटकाचे उत्पन्न त्या रक्तपेढीला देणगीस्वरूप देतात, हा प्रसंग, भाईंच्या व्यक्तिमत्वातील दातृत्वाचा गुण दाखवणारा आहे. तसेच पुढे, पुलं देशपांडे ट्रस्ट आणि मुक्तांगण याबद्दलही उल्लेख येतो (हे महत्वाचे आहे).
बाबा आमटे यांच्या 'आनंदवना'त भाई जातात, आणि तिथल्या भाजी बाजारामध्ये चक्क भाजी विकतात. पण मग, तिथल्या इतर भाजीवाल्यानी केलेली भाजीची नासाडी बघून ते अस्वस्थ होतात. तिथल्या मुलांसाठी ते 'नाच रे मोरा' म्हणत नाचतात देखील. आनंदवनातला हा एकूणच प्रसंग, डोळ्यात पाणी आणून जातो.
भाई आणि विजय तेंडुलकर यांचा एक प्रसंग, त्यांच्या, 'शांतंता कोर्ट चालू आहे' बद्दल भाईंनी दिलेले मत, पारंपरिक आणि आधुनिक नाटकं याविषयीची त्यांची चर्चा, यातून भाईंचा, मराठी नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन अचूकपणे दिसतो.
पूर्वार्धाप्रमाणेच इथेही, (अर्थात अपरिहार्यपणे) येणारा विषय म्हणजे, संगीत. चित्रपटाच्या सुरुवातीला, 'अजुनी रुसूनी आहॆ' म्हणणारे कुमार जी, नंतर आजारी पडतात, आणि त्यांना भेटायला भाई, वसंतराव, भीमसेनजी, हिराबाई, आणि जोडीला माणिक वर्मा, असे जातात, आणि, तिथेच बैठक जमवतात. मग, 'कौसल्येचा राम', 'खरा तो प्रेमा', 'सुरत पिया की', 'वैकुंठीच्या राया', 'सावरे' .... अशी सुरांची मुक्त उधळण होते. हा प्रसंग फारच रंगला आहे. इतका की, या चित्रपटाचे नाव हे, 'दर्शन गुणवंतांचे' असे असायला हवे होते असे वाटते. खरॊखरच, भाईंनी आपल्या आयुष्यात इतकी गुणी मंडळी जोडली होती.
राजकारण (आणि राजकारणी) यावर भाष्य करणारे एक दोन प्रसंग, हे भाईची राजकारणाकडे बघण्याची दृष्टी आपल्याला सांगून जातात.
पूर्वार्धापेक्षा हा उत्तरार्ध थोडा गंभीर झाला आहे (आणि ते साहजिकच आहे). 'भक्ती बर्वे' चे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (ती फुलराणी) बघून आल्यानंतर, भाई आणि सुनीता बाई बोलता बोलता गंभीर होतात हा प्रसंग मनाला स्पर्शून जातो. इथे सूचकपणे, पार्श्वभूमीवर 'शब्दांच्या पलीकडले' वाजते. नंतर हेच गीत सुरांत ऐकू येते (गायक - महेश काळे), आणि मग... पूर्णविराम.
'वक्ता दशसहस्रेषु' असतो असे म्हणतात, पण भाई हे दशलक्षेषु होते असे मी मानतो. त्यांच्यावर दोन भागांत चित्रपट काढला गेला ही फार मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल आपण महेश मांजरेकर आणि टीमचे आभार मानूया.
- नरेंद्र जोशी

No comments:
Post a Comment