तान्हाजी -
माघ वद्य नवमी, शके १५९१ (४ फेब्रुवारी १६७०) या रात्री, सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी डोणागिरी कड्यावरून चढाई करून, सिंहगडावर हमला केला. मोजक्या सैनिकांनी गड चढून जायचा आणि गडाचा मुख्य दरवाजा (इथे कल्याण दरवाजा) आतून उघडून द्यायचा आणि उर्वरित फौजेला वाट करून द्यायची , हीच रणनीती इथेही वापरली होती. त्यावेळी सुभेदार तान्हाजी आणि सिंहगडाचा किल्लेदार उदयभान राठोड यांच्यात घनघोर लढाई झाली. त्यात, सुभेदार आणि उदयभान दोघेही एकाच वेळी धारातीर्थी पडले.
बस्स. इतिहासाला एवढेच माहित आहे. तान्हाजीने या हल्ल्याची पूर्वतयारी कशी केली होती (आणि ती केलेली असणारच), त्याला कोणाची मदत मिळाली होती, उदयभान हा कोण होता, त्याची काही पूर्वकथा होती का? हे आणि असे प्रश्न अनुत्तरित आहेत. इथे तर्क आणि कल्पनाविलासाला बराच वाव आहे. नेमक्या याच ठिकाणी ललित साहित्य पुढे येते. उदयभानाचे 'कमल कुमारी' हे उपकथानक (आणि प्रेमपात्र). हरिभाऊ आपटे यांच्या 'गड आला पण सिंह गेला' या प्रसिद्ध कादंबरीतही तिचा उल्लेख आहे. हे ऐतिहासिक नसले तरी ललित साहित्यात चालते. तसे पाहिले तर, डेन्मार्कच्या इतिहासात हॅम्लेट नावाचा कोणीही राजपुत्र नव्हताच. शेक्सपिअरने तो तिथे नेऊन ठेवला.
असो. इतिहास आणि ललित साहित्याला आपण इथेच सोडूया, आणि अजय देवगणच्या तान्हाजी चित्रपटात काय चालले आहे ते पाहूया (ही कथन शैली हरिभाऊ आपट्यांचीच आहे).
चित्रपट सुरु होतो, तो मोगल सैन्याला खिंडीत गाठून त्यांच्याशी झालेल्या लढाईने. ही बहुधा उंबरखिंडीची लढाई असावी. पुढे मिर्झाराजे जयसिंग, आग्र्याहून सुटका इत्यादी घटनांचा उल्लेख करून, गाडी येते ती सिंहगडापर्यंत. मग रायबाच्या लग्नाची तयारी, उदयभानचा परिचय, त्याचे दख्खनमध्ये आगमन वगैरे. पुढे तान्हाजी आणि उदयभान यांची भेट होते, आणि तान्हाजी कैद होतो. मग कमल कुमारी आणि तिच्या भाईबंदांच्या मदतीने तान्हाजीचं पलायन आणि शेवटी माघ नवमीच्या रात्री केलेला हमला (हा हमला म्हणजे गनिमी कावा होता, की सुलतानढवा? हा प्रश्न आपण तज्ज्ञ मंडळींवर सोपवू.)
इथे उदयभानच्या भूमिकेला जरा जास्त वाव मिळाला आहे. तो शूर आणि तितकाच क्रूर होता हे खरे आहे, पण इथे दिसतो तसा विक्षिप्त आणि काहीसा विकृत नसावा. सैफ अली खान याने ही भूमिका केली आहे. तशा, इथे न पटणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मावळ्यांना रॅपलिंग अँड झुमारिंगची कला अवगत होती असे दिसते. सिंहगडावरून थेट राजगडावर तोफ डागली जाऊ शकते हेही नवीनच. ललित साहित्य.. दुसरे काय ?
अजय देवगण याने मुख्य भूमिका चांगली निभावली आहे. तान्हाजीच्या मराठमोळ्या पत्नीच्या भूमिकेत काजोल छान शोभते, आणि तिने कामही चांगले केले आहे. शिवाजी राजांच्या भूमिकेत शरद केळकर रुबाबदार दिसतात.
चित्रपटाच्या तांत्रिक बाजू सफाईदार आहेत. CGI चा वापर भरपूर केलेला दिसतो. शेवटच्या डोणागिरीच्या चढाईचे चित्रण थरारक आहे . चित्रपटातली नृत्यगीते चांगली झाली आहेत. शेवटचे, End Credits च्या वेळी असेलेले गीत (मला वाटते, श्रेया घोशालने म्हटले आहे) आणि त्याचे चित्रीकरण (पुन्हा काजोल) छान आहे.
सारांश, अनेक न पटणाऱ्या गोष्टी असून सुद्धा हा चित्रपट भावतो. सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन सुद्धा, उगाचच आचरटपणा करणे (उदा. दोन बायका एकत्र नाचवणे) हे अजय आणि नवोदित दिग्दर्शक ओम राऊत याने टाळले आहे ही जमेची बाजू.
जरुर पहावा ...
- नरेंद्र जोशी

No comments:
Post a Comment