ती सध्या काय करते?
तो आणि ती. एकाच सोसायटीत वाढलेले. एकाच शाळेत आणि पुढे एकाच कॉलेजात. एकमेकांचे चांगले मित्र. पुढे कॉलेजात तो, प्रेम आणि आकर्षण यांची गल्लत करतो. तिला गृहीत धरतो. तिच्याशी भांडतो. तो आणि ती, दोघेही आपापल्या भावना व्यक्त करत नाहीत. दोघेही आपापल्या मार्गाने निघून जातात. पुढे अनेक वर्षांनी मित्रांच्या पुनर्भेटीच्या वेळी जुन्या आठवणी निघतात, आणि.....जुन्या खपल्या देखील.
तो सैरभैर होतो. बालपणीचा आणि तारुण्यातला एक गमतीचा काळ आपण तिच्याबरोबर शेअर केलेला आहे. पण आता काय करत असेल ती? कुठे असेल? अशा वेळी नेमकी 'ती' समोर येते.
पण... पण दोघेही काहीच का बोलू शकत नाहीत? 'मी ही तोच, तीच तूही' असे असून सुद्धा? ती सहजच आलेली असते की.... तिला मन मोकळे करायचे असते? की, एक टोचणारी अपराधी भावना मनातून काढून टाकायची असते का? हे सर्व प्रत्यक्ष पडद्यावरच पाहिलेले बरे.
आपण आपले पहिले प्रेम कधीही विसरू शकत नाही, आणि ते कधीही संपत नाही. 'इतकं सगळं वाटून गेलेलं', कधीही पुसलं जात नाही, ही या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना.
कोणाच्याही आयुष्यात घडू शकेल अशी ही साधी सोपी गोष्ट. पटकथा लेखिका लता रविंद्र आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ही कथा अतिशय सुरेख पद्धतीने, वर्तमान आणि भूतकाळ अशा दोन पातळ्यांवर मांडली आहे. वाढत्या वयाबरोबर बदलणारे मुलांचे भावविश्व, तिची निरागसता, कॉलेजातली तरुणाई, त्यातला जोश, 'त्या'ची थोडीशी लबाडी, तारुण्यसुलभ भावनांची अस्थिरता आणि त्यामुळे उडणारा मानसिक गोंधळ, दोघांची भावनिक आंदोलने या सर्व गोष्टी अतिशय बारकाईने दाखवल्या आहेत. ती परत भेटल्यानंतर तिचे काहीसे अलिप्त वागणे हे जरा विचित्र वाटले तरी त्याचा उलगडा शेवटी होतो. हा शेवटचा प्रसंग अतिशय उठावदार झाला आहे.
'त्या'ची भूमिका अभिनय बेर्डे (लक्ष्मीकांत बेर्डेचा सुपुत्र) याने अतिशय समंजसपणे केली आहे. आणि आर्या आंबेकर.... सारेगमप मध्ये गायलेली ही लहान मुलगी.. अभिनयातही भाव खाऊन जाते. हसणारी, रुसणारी निरागस तन्वी तिने छान रंगवली आहे. चित्रपटातले एक गाणेही तिने गायले आहे. प्रौढ अनुराग आणि तन्वी यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान आहेत. दोघांनीही या भूमिका सफाईने केल्या आहेत. अनुरागच्या समजूतदार पत्नीच्या भूमिकेत उर्मिला कोठारे आहे. संजय मोने, सुकन्या आणि तुषार दळवी हे कसलेले कलाकार आपली छाप पडून जातात.
अनेक दिवसांनी एक नितान्त सुंदर मराठी चित्रपट पाहिल्याचे समाधान नक्कीच झाले.
हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला जर आपला भूतकाळ, आपले तारुण्य आठवले नसेल, तर मी एवढेच म्हणेन, "उगाच हापसू नका, राव".

No comments:
Post a Comment