भाई - व्यक्ति की वल्ली
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, पुलदैवत पु ल देशपांडे अर्थात भाई यांचे biopic असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती.
चित्रपट सुरु होतो तो भाईंच्या अखेरच्या आजारपणापासून. भाई ICU मध्ये आहेत आणि तिथे सुनीताबाईंना भेटायला अनेक व्यक्ती येतात, आणि त्यांच्या आठवणींतुन कथानक पुढे सरकते. पटकथेची ही वीण सुरेख.
भाईंच्या कॉलेज जीवन छान रेखाटले आहे. भाई, साहित्यसम्राट न. चिं. केळकरांना, 'सध्या पुण्यात अंजीराचा भाव काय आहे?' असे विचारून हशा पिकवतात, किंवा ते कवी (आणि प्रो.) मर्ढेकरांच्या 'कुणी नको काही नको' या कवितेला चाल लावतात हे प्रसंग छान. भाईंच्या प्रथम विवाहाचा, काहीसा अपरिचित कथाभाग इथे येतो.
पुढे भाईंचा नाट्यसृष्टीत प्रवेश आणि नंतर सुनीता बाईंचा परिचय आणि विवाह. त्यापैकी विवाहाचा प्रसंग फारच गमतीदार झाला आहे.
भाईंचा चित्रपट सृष्टीतला प्रवास दाखवताना त्यात ग दि माडगूळकरांबरोबरचे 'नाच रे मोरा' चे sitting येते. आणि मधेच बेळगावचे रावसाहेबही डोकावून जातात.
संगीत हा भाईंच्या जीवनातला अविभाज्य पैलू. त्याशिवाय भाईंच्या जीवनावरील कोणतीही कलाकृती ही अपुरीच राहिली असती. त्यामुळे, उत्तरार्धातला बराचसा भाग हा संगीतावर बेतलेला आहे यात नवल नाही. उत्तरार्धात, ICU मध्ये पं. भीमसेन जोशी भेटायला येतात, आणि संगीतविषयक आठवणी उलगडत जातात. भाई, पंडितजी आणि वसंतराव देशपांडे हे तिघे मिळून चंपूताई (हिराबाई बडोदेकर) यांच्या घरी जातात, आणि तिथे पं. कुमार गंधर्व यांच्यासोबत मैफिल जमते... हा कथाभाग फारच रंगला आहे. 'सावरे ऐजईयो', 'कानडा राजा' आणि 'इंद्रायणी काठी' ही गीते अतिशय उत्तम जमली आहेत. यातील 'इंद्रायणी काठी' हे End Credits च्या वेळी येते. ती End Credits संपेपर्यंत (आणि चित्रगृह रिकामे होईपर्यंत) मी ते गाणे ऐकत थांबलो होतो.
कथानकाच्या ओघात अनेक मान्यवर व्यक्तीरेखा समोर येतात: डॉ जब्बार पटेल, राम गबाले, बाबासाहेब पुरंदरे इ.
तसेच दोन वल्ली, वेगळ्या नावाने समोर येतात (नाथा कामत, आणि अंतू बरवा). मला वाटते, ह्या व्यक्ती भाईंना कधीतरी भेटल्या असाव्यात, आणि भाईंनी मग त्यांची नावे बदलून व्यक्तिचित्रे लिहिली असावीत. असो.
भाईंच्या भूमिकेतले सागर देशमुख हे हुबेहूब भाईंसारखे दिसतात, आणि 'वाटतात' देखील (हे महत्वाचे). सुनीता बाईंची करारी पण प्रेमळ भूमिका इरावती हर्षे यांनी उत्कृष्ट केलेली आहे. ही भूमिका भाईंच्या इतकीच महत्वाची आहे हे लक्षात ठेवायला हवे. भाईंच्या आई वडिलांच्या भूमिकेत अश्विनी गिरी आणि सचिन खेडेकर आहेत.
पटकथा आणि संवाद हे ह्या (आणि कोणत्याही) चित्रपटाचे प्राणच. या चित्रपटाच्या या बाजू तसूभर जरी कमी पडल्या असत्या, तर तो चित्रपट न होता विचित्रपट झाला असता (हा विनोद माझा नसून कथानायकाचा आहे). या ठिकाणी साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि गणेश मतकरी यांनी या बाजू अतिशय समर्थपणे सांभाळल्या आहेत. भाईंच्या स्वभावाचे निरनिराळे पैलू (विसराळूपणा वगैरे) योग्य तर्हेने दाखवून, त्यांचे चित्रण कुठेही एकसुरी होणार नाही याची काळजी घेतलेली दिसते.
तांत्रिक दृष्ट्या चित्रपट सफाईदार. संगीत संयोजन अजित परब यांचे आहे.
एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व cover करणे हे महा कर्मकठीण. परंतु महेश मांजरेकर आणि टीम ने हे शिवधनुष्य उत्तम पेलले आहे.
आता प्रतीक्षा आहे ती उत्तरार्धाची. यात आचार्य अत्रे, विजया मेहता, भक्ती बर्वे, बाबा आमटे हे आपल्यासमोर येतील (यात नंदा प्रधान असेल का? बघूया).
- नरेंद्र जोशी

Very aptly articulated the story of the movie.👌👌👌
ReplyDelete१००टक्के सहमत आहे.
ReplyDelete