परीसस्पर्श:
परिसाच्या स्पर्शाने जसे सोने निर्माण होते तसे, जितेंद्र अभिषेकी या स्वररूपी परिसाच्या स्पर्शाने अनेक संगीत कलाकृतींचे सोने झाले आहे. अभिषेकी बुवांचा संगीत प्रवास, त्यांचे संगीत विषयक विचार आणि त्यांनी हाताळलेले विविध संगीत प्रकार यांचा मागोवा घेण्याचा एक प्रयत्न, बुवांचा शिष्य महेश काळे यांनी केलेला आहे.
आता या ठिकाणी एक स्पष्टीकरण: महेश काळे याचा उल्लेख मी एकेरी करतो ते केवळ आपलेपणाच्या भावनेतूनच. बघा, आपण नेहमी म्हणतो: ती लता, तो सुनील (गावसकर), तो रफी, तो किशोर... तसा, तो महेश. पूर्वी, ज्ञानेश्वरांना कोणता मायना लिहावा हे निश्चित न झाल्याने, चांगदेवांचे पत्र कोरेच राहिले होते (आणि मग मुक्ताईने त्यांची 'कोरा रे कोरा' अशी संभावना केली होती) तसे माझे न होवो, आणि, महेशला कोणत्या नावाने संबोधन करावे याचा विचार करता करता, माझा ब्लॉग कोराच राहिला असं न होवो, हीच इच्छा. असो.
कार्यक्रमाची सुरुवात 'अनंता तुला कोण पाहू शके' या बोरकरांच्या गीताने झाली. बुवांच्या आवाजातली ही रेकॉर्ड वाजवून, मग महेशने त्याच सुरात सूर मिसळून गीत पूर्ण केले. त्याचा संदर्भ घेऊन मग बुवांविषयी थोडी माहिती सांगितली.
अभिषेकी बुवा हे मूळचे गोव्यातले, मंगेशीचे. अभिषेकी आणि मंगेशकर कुटुंब हे नातेवाईक आहेत. मंदिरातली स्तोत्रे, सूक्ते, आणि कीर्तन यांचे संस्कार बुवांवर लहानपणापासूनच झाले. पुढे बुवांनी अनेक गुरूंकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. कोणत्याही एका घराण्याला बांधून न घेता, त्यांनी अनेक घराण्यांतुन जे जे चांगले दिसेल ते ते वेचले आणि आत्मसात केले. इथे कीर्तनाच्या धर्तीवर, महेशने 'जय जय राम कृष्ण हरी' चा गजर केला.
या वाटचालीच्या संदर्भामध्ये महेशने काही रचना सादर केल्या. त्यात यमन मधला झपतालातला तराणा फारच सुरेख जमला. खूप पूर्वी, म्हणजे दूरदर्शन हे काळेपांढरे होते, त्या काळात, अभिषेकी बुवांनी, मुलतानी-ते-भैरवी असा एक कार्यक्रम सादर केला होता, त्यात बुवांनी हा तराणा म्हटलेला मला स्पष्ट आठवतो. महेशने तो त्याच्या पद्धतीने म्हटला.
बुवांनी काही हिंदी रचना स्वरबद्ध केलेल्या आहेत. त्यापैकी, रसखान या संतकवींच्या लिहिलेली 'शाम तोरी मुरत ह्रिदय समाई' ही रचना सादर केली. त्याचा मुखडा हा काहीसा 'याच साठी केला होता अट्टाहास' सारखा वाटला. पुढची चाल अर्थातच वेगळी होती.
स्वतः संगीतकार असलेल्या अभिषेकी बुवांनी इतर संगीतकारांकडे अनेक गीते म्हटलेली आहेत. याचे उदाहरण म्हणून महेशने, 'गुरु एक जगी त्राता' हे गीत सादर केले. एका मराठी चित्रपटासाठी, बाबूजी सुधीर फडके यांनी हे गीत स्वरबद्ध केलेले आहे. दुर्दैवाने तो चित्रपट प्रकाशित न झाल्याने, हे गीत फारसे कोणी ऐकले नाही. त्यामुळे, बाबूजी आणि अभिषेकी असा समसमा संयोग होऊ शकला नाही. गीत उत्कृष्ट आहे यात शंकाच नाही.
त्यानंतर महेशने 'शब्दांच्या पलीकडले' हे मंगश पाडगावकरांचे, पुलं देशपांडेनी संगीत दिलेले गीत म्हटले. हे गीत, मुळात, 'बिल्हण' या रेडिओवर सादर केलेल्या एकांकिकेतले आहे. (याच एकांकिकेत, 'माझे जीवन गाणे' ही आहे).
अभिषेकी बुवांच्या संदर्भात, नाट्य संगीताचा उल्लेख होणे हे केवळ अपरिहार्य. संगीत रंगभूमी अस्ताचलाला जाते की काय अशा अवस्थेत असताना, बुवांचे 'मत्स्यगंधा' हे संगीत नाटक रंगभूमीवर आले, आणि नाट्य संगीताला एक नव संजीवनीच मिळाली. या नाटकातली सर्वच गाणी लोकप्रिय झाली. या ठिकाणी, महेशने, नाट्य संगीताविषयीचा बुवांचा दृष्टिकोन उलगडून दाखवला. जुन्या संगीत नाटकातली गाणी, ही संथ, लांबलचक आवर्तने असलेली असायची. त्यामुळे, ती नाटकेही तासनतास चालायची. पण, हा फॉरमॅट, 'शेवटची गाडी चुकेल' अशी भीती असलेल्या सद्यकाळात चालणार नव्हता. तेव्हा, नाटक compact करण्यासाठी, बुवांनी लहान आवर्तने असलेली गाणी दिली. त्यामुळे, कमी वेळात गायलेल्या गाण्यात देखील, पुष्कळ काही व्यक्त केले जाऊ शकत होते. बुवांचा हा नवा दृष्टिकोन विचार कारण्यासारखा आहे.
इथे, मत्स्यगंधा नाटकातली सगळी गाणी सादर करणे शक्य नसल्याने, महेशने त्या गाण्यांची एक शृंखला सादर केली. शेवटचे, 'देवाघरचे ज्ञात कुणाला' हे मात्र संपूर्ण म्हटले. नंतर, लोकाग्रहास्तव, 'हे सुरांनो चंद्र व्हा' हे, चारुकेशी रागात बांधलेले हे पद म्हटले.
बुवांचे दुसरे एक लोकप्रिय नाटक म्हणजे, अर्थातच, कट्यार. त्यात 'घेई छंद मकरंद' हे एकच पद, दोन वेगळ्या स्वरूपात, आपल्या समोर येते. एकदा संथ लयीत, सालग वराळी या रागात, तर एकदा द्रुत लयीत, भीमपलास-धानी या रागात. महेशने, ही दोन्ही रूपे तितक्याच समर्थपणे दाखवली.
नाट्य संगीत, भाव संगीत याच बरोबर बुवांनी म्हटलेल्या भजन आणि अभंगांची संख्या मोठी आहे. संत तुकाराम, एकनाथ, चोखोबा, सोहिरोबा अशा थोर संतांच्या रचना बुवांनी म्हटलेल्या आहेत. याची एक श्रुंखला महेशने सादर केली. हा म्हणजे, या मैफिलीचा कळसच होता. ज्यांना अजून पंढरपूरीच्या बाप रखुमादेवीवराचे दर्शन होऊ शकलेले नाही, त्याना, महेशने जणू आपल्या गानसामर्थ्याने पंढरपूरची वारीच घडवून आणली असे म्हटले तरी चालेल.
'बंधनापासूनि उकलल्या गाठी' इथपासून सुरु झालेली ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, 'अबीर गुलाल' उधळत, जाता जाता 'आम्हा न कळे ज्ञान' अशी कबुली देत, गर्जणाऱ्या पंढरपूरपर्यंत येऊन, 'विठ्ठल विठ्ठल' नामाचा गजर करून संपन्न झाली.
सुमारे अडीच तास चाललेला हा कार्यक्रम म्हणजे, 'देता किती घेशील दो कानांनी' असाच होता. सर्व साथीदारांची (निखिल फाटक, आनंद कर्वे इ.) कामगिरी उत्कृष्ट होती. अश्विनी भावे यांनी नेमके आणि समर्पक असे निवेदन केले.
खरोखरच, महेशची गुरुवरील श्रद्धा, गानकलेवर असलेली निष्ठा या गोष्टी अतिशय कौतुकास्पद आहेत. एक पैसाही गुरुदक्षिणा म्हणून न घेता, शिष्याना मुक्त हस्ते ज्ञान देणारे अभिषेकी बुवांसारखे गुरु हे धन्य, आणि त्यांचे गाणे सश्रद्धपणे आणि कृतज्ञतेने पुढे नेणारा महेश सारखा शिष्यही धन्य.

माझा आवडता गायक आणि त्याचे दैवत अभिषेकी बुवांनी संगीत दिलेल्या अजरामर गीतांवर आधारित तुझा परीसस्पर्श अप्रतिम.तुझी लेखनशैली फारच छान
ReplyDelete