इसवी सन १६६६ चा सुमार. मिर्झा राजे जयसिंहांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज आग्र्याला रवाना झाले होते. औरंगजेबाच्या सालगिरह प्रसंगी त्याचा दरबारात अपमानित झालेले महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेत पडले. त्यांच्या निवास स्थानावर फुलादखानाचा सख्त पहारा बसला. मराठ्यांचा राजा कैदेत पडला.
औरंगजेबाचा हेतू उघड होता. मिर्झा राजांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या हमीमुळे तो जरा कचरत होता. पण संधी मिळताच महाराजांचा घात करण्याचा त्याचा इरादा होता.
महाराजांनी तो अचूक ओळखला होता.
No comments:
Post a Comment